Service Selection Board चे पाच दिवसाचे प्रशिक्षणाचे आयोजन

Posted by

सतरा महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, अहमदनगर अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेना चे युनिट डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे. या युनिटचे आत्तापर्यंत सैन्यामध्ये अधिकारी झालेले आहेत तसेच काही प्रशासकीय अधिकारी आयएएस सुद्धा आहेत याहीपेक्षा सध्याचे माननीय कुलगुरू डॉक्टर पीजी पाटील हे सुद्धा याच छात्रसेना युनिटचे माजी छात्र आहेत आणि त्यांना नुकतीच डिफेन्स मिनिस्ट्री आणि डीजीएनसीसी यांच्याकडून मानद कर्नल पदवी दहाल करण्यात आलेली आहे.

        या महाविद्यालयाच्या युनिट तर्फे अनेक सामाजिक उपक्रम जसे रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, पुनीत सागर अभियान, फिट इंडिया मिशन, स्टॅच्यू क्लिनिंग या आणि अशा प्रकारे विविध कार्यक्रम राबविलेले आहेत तसेच या युनिटला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये माजी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एम एम विटेकर, माजी कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे सर तसेच ॲडिशनल डायरेक्टर ए डी जी मुंबई डायरेक्ट महाराष्ट्र स्टेट ब्रिगेडियर विक्रांत कुलकर्णी आणि आताचे ग्रुप कमांडर औरंगाबाद ब्रिगेडियर ओझा यांची यांच्या भेटी झालेले आहेत.

       सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एनसीसी युनिट तर्फे वेबिनार ऑन हाऊ टू क्रॅक सर्विस सेलेक्शन बोर्ड, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप, सुपर सक्सेसफुल माईंडसेट वर्कशॉप, कॅम्पस टू कॉर्पोरेट वर्कशॉप यासारखे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून विद्यार्थी आणि छात्र हे कशाप्रकारे जास्तीत जास्त सैन्यामध्ये अधिकारी म्हणून जातील यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिल्या जाते.

     आतापर्यंत महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी आणि राष्ट्रीय छात्र सेने छात्रांनी सैन्यामध्ये विविध पदावर निवड झालेली आहे. त्यामध्ये विग कमांडर विजयसिंह देसाई1995, कर्नल संपत जाधव1998, कर्नल नितेश सुतार 1998, कॅप्टन जयंत पवार1998, जयंत थोरात-2003, कमांडर रमेश टाळके 2003, असिस्टंट कमांडर तुषार गावडे -2015, असिस्टंट कमांड सुरजन पिसाळ 2015, असिस्टंट कमांडंट सचिन जाधव 2017, असिस्टंट कमानंट अक्षय उगले 2017, असिस्टंट कमांडंट अक्षय उगले 2017, सब लेफ्टनंट वरद शिंदे 2020,  लेफ्टनंट महेश वाबळे 2020, लेफ्टनंट सिद्धेश भालेराव 2021, लेफ्टनंट सिद्धेश बोबडे 2022 विद्यार्थ्यांची निवड ही सैन्यामध्ये अधिकारी पदावर झालेली आहे.

       राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे महाविद्यालयामध्ये ब्रिगेडियर बोधे इन्स्टिट्यूट, पुणे यांच्यामार्फत सर्विस सेलेक्शन बोर्ड (Service Selection Board) पाच दिवसाचे प्रशिक्षण हे

सहा ते 11 जून या दरम्यान देण्यात येणार आहे.  यामध्ये सैन्यामध्ये अधिकारी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत त्या परीक्षा आणि प्रशिक्षण सतत पाच दिवस नऊ ते सहा या दरम्यान दिल्या जाईल.

SSB प्रशिक्षण, 06-10 जून 23 चे वेळापत्रक.

06 जून, मंगळवार

1100h ते 1300h, व्यक्तिमत्व आणि SSB च्या संकल्पनेचा परिचय.

1400- 1800h, सत्र चालू

टप्पा – 1 OIR चाचणी आयोजित करणे आणि PPDT चा सराव.

07 जून, बुधवार,

0900-1300h, मानसशास्त्रीय चाचण्यांचे आयोजन.

1400-1800h, मानस चाचण्यांच्या प्रतिसादांवर चर्चा.

08 जून. गुरुवार

0900h- 1300h. मुलाखत तंत्राचा परिचय, मॉक इंटरव्ह्यूचे आयोजन.

1400-1800h , GTO तंत्राचा परिचय आणि चाचण्यांचे संचालन.

09 जून, शुक्रवार.

0900-1600h, GTO चाचण्यांचे आयोजन.

10 जून, शनिवार.

 0900 – 1100h, GTO चाचण्यांच्या प्रतिसादांवर चर्चा.

1100-1300h, परिषद प्रक्रिया, सारांश आणि अभिप्राय.

 यां प्रशिक्षणासाठी आणि राष्ट्रीय छात्र सेना युनिटर्फे विविध कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व कर्नल कमांडंट एनसीसी कर्नल डॉक्टर पाटील सर तसेच डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. डी. पवार सर आणि 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन  गुरुबक्ष सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. तसेच या प्रशिक्षणासाठी उपाध्यक्ष विद्यार्थी परिषद डॉ अतुल अतुल अत्रे, FSRE चे विभाग प्रमुख डॉ. व्ही एन.बाराई , एग्रीकल्चर प्रोसेसिंग इंजीनियरिंग चे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, FMPE विभाग प्रमुख डॉक्टर एस एम नलावडे ,  IDE विभागाचे प्रमुख डॉक्टर एस बी गडगे, क्रीडा विभागाचे प्रमुख प्राध्यापक डी. एम. गायकवाड यांचे मोलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट सुनील उत्तम फुलसावंगे सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी यांनी केलेले आहे.

One response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *