राहुरी कृषि विद्यापीठात काटेकोर शेती तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी प्रशिक्षण संपन्न
राहुरी विद्यापीठ, दि. 19 जुलै, 2024
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील काटेकोर शेती विकास केंद्र व एनसीपीएएच, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने काटेकोर शेती विकास केंद्र येथे काटेकोर शेती तंत्रज्ञानावर आधारित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. सुनिल कदम, श्री. सचिन मोरे, डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. गिरीष भनगे यांनी शेतकर्यांना काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी आयओटी तंत्रज्ञान, काटेकोर शेतीसाठी हरितगृह तंत्रज्ञान, संरक्षित लागवडीसाठी शासकीय योजना या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेन्टर ऑफ एक्सलेन्स या प्रक्षेत्राला शेतकर्यांची भेट आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींना विविध आयओटी तंत्रज्ञान उपकरणांची माहिती देवून प्रक्षेत्रावर ड्रोन फवारणी तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह दाखविण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. एस.बी. गडगे व काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. सचिन डिंगे्र उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस.बी. गडगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्यातील विविध गावांतुन आलेले 35 शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि सहाय्यक श्री. योगेश राजळे व श्री. रंजन पांडे यांनी विशेष मेहनत घेतली.
