हात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. मिलिंद अहिरे यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सपत्नीक सुरु केलेले आमरण उपोषण मागे

Posted by

आश्वासनानंतर कृषि विद्यापीठातील उपोषण मागे
राहुरी विद्यापीठ, दि. 16 जुलै, 2024
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. मिलिंद अहिरे यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सपत्नीक सुरु केलेले आमरण उपोषण दि. 15 जुलै, 2024 रोजी संध्याकाळी मागे घेतले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार सर्व प्राध्यापकांचे पदोन्नतीचे प्रस्ताव कृषि परिषदेकडे पाठविण्याचे प्रशासनाने मान्य केले. यावेळी उपोषणस्थळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांनी पुढाकार घेवून सामंजस्याची भुमिका दाखवत उपोषणकर्ते प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे आणि त्यांची पत्नी सौ. वैशाली अहिरे यांची भेट घेतली व उपोषणावर तोडगा निघण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. तरी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने त्यांना आश्वासीत करण्यात आले. आश्वासन मिळाल्यानंतर डॉ. मिलिंद अहिरे यांनी उपोषण सोडण्याचे मान्य केले. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांनी उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देवून उपोषण सोडविले. डॉ. मिलिंद अहिरे हे त्यांच्या मागण्यांसाठी दि. 10 जुलै, 2024 पासून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळ पत्नीसह उपोषणास बसले होते. विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. अहिरे यांच्या उपोषणाविरोधात दि. 15 जुलै, 2024 मुक मोर्चा देखील काढला होता.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ