संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या हस्ते हाळगावच्या कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण
राहुरी विद्यापीठ, दि. 10 जुलै, 2024
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्याल, हाळगाव येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कृषि महाविद्यालयातील प्रयोगशाळा, प्रक्षेत्र, ग्रंथालय व जिमखाना या विकास कामांचा सहयोगी अधिष्ठाता व महाविद्यालयातील शिक्षक यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. या भेटी दरम्यान डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. नजीर तांबोळी, प्रा. पोपट पवार, प्रा. अरुण पाळंदे व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या हस्ते हाळगावच्या कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण
Posted by
–
Follow Us
Recent Posts
- पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे, एनसीसी युनिट, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे यशस्वी आयोजन
- विद्यार्थ्यांनी आयुष्यात सहकार्याची भावना जोपासावी
- राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफणचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ
- महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफण-2024 कार्यक्रम संपन्न
- डिजिटल तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर ठरणार
Categories
- Agriculture 21
- Education 32
- News 13
- Technology 11
- Uncategorized 2
Tags
कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ