शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान गरजेचे

Posted by

  • मा.आ.सौ. माहेश्वरी वाले
    राहुरी विद्यापीठ, दि. 9 जुलै, 2024
    डिजिटल तंत्रज्ञानामध्ये शेतीला अधिक उत्पादनक्षम, संसाधनाचा आणि वेळेचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्याची क्षमता आहे. आधुनिक शेतीसाठी नवनवे डिजिटल तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गुलबर्गा कर्नाटकाच्या विधानसभेच्या सदस्य आ.सौ. माहेश्वरी वाले यांनी केले.
    महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि माजी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या अद्ययावत व काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान प्रकल्पास भेट देतांना सौ. माहेश्वरी वाले बोलत होत्या. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे व प्रकल्पाचे सहप्रमुख अन्वेषक डॉ. सुनिल कदम उपस्थित होते.
    यावेळी डॉ. मुकुंद शिंदे यांनी स्वयंचलित पंप प्रणाली, सेंसर आधारित सिंचन प्रणाली आणि आयोटी पार्कबद्दल माहिती दिली. डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोन आणि रोबोटिक्स प्रयोगशाळेबद्दल आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. हायपरस्पेक्टरल इमेजिंग प्रयोगशाळेविषयी आणि संशोधनाबद्दल माहिती डॉ. सुनिल कदम यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विठ्ठल शिर्के यांनी स्वागत केले.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ