महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफण-2024 कार्यक्रम संपन्न

Posted by

महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफण-2024 कार्यक्रम संपन्न
शेती शाश्वत होण्यासाठी शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे

  • कुलगरु डॉ. पी.जी. पाटील
    राहुरी विद्यापीठ, दि. 26 मे, 2024
    दिवसेंदिवस भारतीय शेतीसमोर जमिनीचे आरोग्य, पिकांवरील विविध किडी व रोग, पिकांच्या काढणीपासून ते साठवणुकीपर्यंत खुप आव्हाने आहेत. दिवसेंदिवस प्रति शेतकरी जमीनधारण क्षेत्र कमी होत आहे. या लहान व मध्यम शेतकर्यांसमोरच्या अडचणी मुख्यत्वे करुन मजुरासंबंधीच्या आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेतीचे यांत्रिकीकरण गरजेचे आहे. प्रामुख्याने ऊस आणि श्रीअन्न या सारख्या पिकांचे काढणीसाठी स्वस्त यंत्रे विकसीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे असून त्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
    महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-2024 या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जॉन डियर इंडिया प्रा.लि.चे व्यवसाय संचालक श्री. मनीष पंत उपस्थित होते. यावेळी कमीन्स कंपनीच्या तांत्रिक संचालीका श्रीमती नेहा मिश्रा सन्माननीय अतिथी म्हणुन उपस्थित होत्या. याप्रसंगी कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, प्राध्यापक डॉ. के.सी. वोरा, कार्यक्रमाचे समन्वयक सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री. अजय अग्रवाल, सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स इंडियाचे ऑफ हायवे अध्यक्ष श्री. कृष्णांत पाटील, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
    यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. मनीष पंत म्हणाले की या स्पर्धेतून तुम्ही फक्त नविन तंत्र विकसीत करत नसुन तुम्ही यांत्रिकीकरण संशोधनाला पुढील दिशा देत आहात. सध्याच्या जगाला सुसंगत असे यंत्रे विकसीत करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्याच्या भावनेने तांत्रिक मुद्यावर एकत्र येवून प्रत्यक्ष शेतीमधील आव्हानांना तोंड देता येईल असे तंत्रज्ञान विकसीत करणे महत्वाचे आहे. श्रीमती नेहा मिश्रा आपल्या भाषणात म्हणाल्या की भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशातील शेतकर्यांसाठी यंत्रे व अवजारे विकसीत करतांना ते शेतकरीभिमुख व त्यांच्या गरजेनुसार असणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामध्ये जादू आहे म्हणुन तुमच्या संकल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देवून त्याला मृर्त स्वरुप द्या. तिफण-2024 ही तंत्रज्ञान विषयक स्पर्धा एकमेव असून ती जागतीक दर्जापर्यंत पोहचणे भारतातील शेतीसाठी फायद्याचे ठरेल. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. दिलीप पवार, डॉ. के.सी. वोरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. अजय अग्रवाल यांनी तिफण-2024 च्या प्रवासाविषयी माहिती दिली. यावेळी या तिफण-2024 या स्पर्धेतील विविध पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम विजेता संघ ठरला लुधीयाणा येथील पंजाब कृषी विद्यापीठाचा संघ यांना दीड लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पहिले उत्तेजनार्थ बक्षीस पंजाब येथील जी.एन.ए. विद्यापीठ संघास रोख रुपये एक लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघास 75 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध नऊ प्रकारातील विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सहभागी सदस्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर यावेळी या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून काम केलेल्या विविध कंपन्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री. कृष्णांत पाटील यांनी पुढील वर्षी होणार्या तिफण-2025 या स्पर्धेचे समन्वयक म्हणून सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री. संदिप राजपूत यांच्या नावाची घोषणा केली.
    या कार्यक्रमाचे आभार डॉ. संचिन नलावडे यांनी मानले. डॉ. नानासाहेब पवार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पटेल, शितल कोलते, निकिता शिळीमकर, भूषण शेवाळे व अभिलाश साहू यांनी केले.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ