महात्मा फुले कृषि विद्यापीठात ८ अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्तसर्वांच्या सहकार्यातूनच विद्यापीठ घडत असते

Posted by

  • कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
    राहुरी विद्यापीठ, दि. ३१ जुलै, २०२४

आज विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्यांच्या मनात संमिश्र असे भाव असतील. खूप साऱ्या आठवणी असतील. या दिवशी इतर अधिकारी तसेच कर्मचारी यांनाही समजेल की त्यांचे वरिष्ठ सहकारी किती आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे या विद्यापीठाच्या सेवेत काम करत होते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक कर्तव्यामधूनच विद्यापीठ घडत असते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार व सेवानिवृत्त विषयक लाभ देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाने, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, प्रभारी नियंत्रक डॉ. भरत पाटील उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व सेवानिवृत्तीचे लाभ दिले तर ही त्यांच्या कामाची पोहोच पावती होईल व कर्मचारी आनंदाने सेवानिवृत्त होतील. आपल्या विद्यापीठाचे नांव हे विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांच्या योगदानामुळे आहे. कुलगुरुंनी यावेळी सेवानिवृत्त होणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या राहुरी व पुणे या दोन विभागातील ८ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणारे डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. सुखदेव रणसिंग, डॉ. विश्वास चव्हाण, श्री. लक्ष्मणदास वैष्णव व श्री. वसंत पवार या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांच्या कार्यतत्पतेमुळे सेवानिवृत्त होणार्या या अधिकारी व कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्तीविषयक लाभ अदा करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के, श्री. अरुण आनंदकर, डॉ. दिलीप पवार, डॉ. साताप्पा खडबडे, डॉ. आनंद सोळंके, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. विजू अमोलिक, डॉ. महाविरसींग चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. सुखदेव रणसिंग व डॉ. विश्वास चव्हाण यांनी यावेळी सत्काराला उत्तर देतांना आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय रुपनर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. विजय पाटील, श्री. सुनील आव्हाड, श्री. वसंत अडसूरे, श्री. बाळासाहेब पाटील, श्री. विनोद फुगारे, श्रीमती शैला पटेकर व श्रीमती शिल्पा चतारे यांनी अथक परिश्रम घेतले.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ