महात्मा फुले कृषि विद्यापीठात महसूल दिन साजरा राहुरी विद्यापीठ, दि. 2 ऑगस्ट, 2024

Posted by

मतदान देण्यासाठी आपले नांव मतदार यादीमध्ये असणे गरजेचे आहे. या महसुल सप्ताहानिमित्त ज्या विद्यार्थ्यांचे नांव मतदान यादीत नाही त्यांनी आपले नांव मतदार यादीत नोंदवावे. त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाही सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि कुलमंत्री डॉ. विजय पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व राहुरीचे तहसीलदार श्री. नामदेवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर महाविद्यालय आणि महसूल विभाग, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताहानिमित्त महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. विजय पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बारागाव नांदुर येथील मंडळ अधिकारी सौ. सुनंदा मरकड उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर पदव्युत्तर महाविद्यालयातील अंतरविद्याशाखा जलसिंचन विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. देविदास खेडकर, प्रसारण केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन सदाफळ व पदव्युत्तर महाविद्यालयाचे कार्यालय अधिक्षक श्री. किरण शेळके याप्रसंगी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना सौ. सुनंदा मरकड म्हणाल्या की महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग दि. एक ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान महसूल महसूल पंधरवडा साजरा करीत आहे. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत बारावी पास उत्तीर्ण असणार्या विद्यार्थ्यांसाठी रु.6000/-, आयटीआय किंवा ग्रॅज्युएट असणार्या विद्यार्थ्याला रु.8000/- तर पदव्युत्तर पदवी धारण करणार्या विद्यार्थ्यास रु.10,000/- मिळणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्ष इतके तर आधार कार्ड बँकेला लिंक असणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांनी प्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी त्यांनी शासनाचे महत्वाचे कायदे, विकास योजना व विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शैक्षणीक कागदपत्रे महसुल विभागातून कसे उपलब्ध करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किरण शेळके यांनी तर आभार डॉ. देविदास खेडकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पद्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ