प्रेस नोटमहात्मा फुले कृषि विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे आणि डॉ. डी. के.कांबळे यांनी त्यांच्यावर मागासवर्गीय असल्याने झालेला अन्याया संदर्भात सुरु केलेल्या उपोषणा बद्दल वस्तुस्थिती

Posted by

राहुरी विद्यापीठ, दी.१२ जुलै,२०२४

१) विद्यापीठातील नियमित असणारी पदे (विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता आणि संचालक) हि निवड पद्धतीनेच / नामांकनाद्वारेच भरावी असा विद्यापीठ कार्यकारी परिषदेने ठराव आधीच पारित केला असल्याने कोणत्याही प्राध्यापकाचे विभाग प्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी अर्ज MCAER कडे पाठवले गेले नाहीत.

पार्श्वभूमी
विभाग प्रमुख पदावर पदोन्नतीसाठी, उमेदवाराला किमान ३ वर्षांचा नियमित प्राध्यापकाचा अनुभव असणे गरजेचे आहे. मात्र, २००८ पासून नियमित विभागप्रमुखांचे पद असलेल्या विभागांमध्ये/विषयांमध्ये थेट निवड पद्धतीने प्राध्यापकांची पदे भरण्यात आली नाहीत. केवळ प्राध्यापक पदांवर पदोन्नती देण्यात आली होती. काही विभागांमध्ये काही कर्मचाऱ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून प्राध्यापक पदावर पद्न्नोणती/ बढती देण्यात आली होति. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे , ज्या व्यक्तीने jumping आरक्षणाचा लाभ घेतला असेल, त्याला/तिला पुढील उच्च पदावर बढती देता येणार नाही. शिवाय, कोणत्याही सहयोगी प्राध्यापकाला विभाग प्रमुख या पदावर बढती देता येणार नाही. तथापि, 7 वर्षांचा अनुभव असलेला कोणताही सहयोगी प्राध्यापक थेट निवडीद्वारे भरल्या जाणा-या विभाग प्रमुख पदासाठी अर्ज करू शकतो.
यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याने, नियमित असणारी सर्व पदे निवड पद्धतीद्वारे / नामनिर्देशनाद्वारे भरण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला जो सर्वांच्या हिताचा आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेत सुद्धा कार्यकाळ असणारी पदे हि निवड पद्धतीनेच / नामांकनाद्वारेच भरली जातात.

२) डॉ. एम.एस. माने यांच्याकडे सहयोगी अधिष्ठाता कार्यभार देणे बाबत
डॉ. एम.एस. माने यांच्या कडे पुणे येथील कृषी महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाता या पदाचा पदभार नियमितपणे न देता तात्पुरता स्वरुपात देण्यात आला आहे. केंद्रशासन पुरस्कृत आय.आय.टी. कानपूर यांच्या समन्वयाने सुरु असलेला अतिशय महत्त्वाच्या cGanga (नमामि गंगे) नेटवर्क प्रकल्पाच्या उपक्रमांना चालना देण्या साठी केले गेले. या प्रकल्पासाठी विद्यापीठाकडून डॉ. माने हे नोडल अधिकारी असल्याने आणि प्रकल्प पुणे येथे राबविण्यात येत असल्याने, हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी डॉ. माने यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार विद्यापीठ हितासाठी देण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियम १९९० मध्ये नमूद केलेल्या मा.कुलगुरूंच्या अधिकारात घेण्यात आला आहे. तथापि, कोणतीही पात्र प्राध्यापक सहयोगी अधिष्ठाताच्या पदासाठी जेव्हाही जाहिरात येईल तेव्हा अर्ज करू शकतात .

३) डॉ. कांबळे आणि डॉ. अहिरे यांना चौकशीच्या अधीन राहून नाहरकत दाखला/ NOC देणे बाबत
या दोन प्राध्यापकांची विभागनिहाय चौकशी सुरू आहे. या दोन्ही प्राध्यापकांना उच्च पदांच्या अर्जांसाठी चौकशीच्या अधीन राहून नाहरकत दाखला देण्यात आला. मी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच डॉ.डी.के.कांबळे यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.

४) हे लक्षात घेण्यासारखे आहे की विद्यापीठात 50% पेक्षा जास्त वरिष्ठ पदांवर मागासवर्गीय अधिकारी आहेत.

  1. तीन संचालक (संचालक संशोधन, संचालक शिक्षण , संचालक विस्तार शिक्षण)
    (तीन पैकी तीन : १०० %)
  2. सहयोगी अधिष्ठाता (पद्युतर महाविद्यालय , नी. कृ. शी , अभियांत्रिकी महाविद्यालय ,
    धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, मुक्ताईनगर)(१० पैकी ७ : ७० %)
  3. विभाग प्रमुख (वनस्पतिशास्त्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र , मृद विज्ञान, विस्तार,
    अर्थशास्त्र, कीटकशास्त्र, कृषि हवामानशास्त्र इ. )(१३ पैकी ७ : ५४ %)
  4. सहयोगी संशोधन संचालक (सोलापूर, पुणे) (५ पैकी २ : ४० %)
  5. पीक विशेषज्ञ (गहू (निफाड), मृदा(सोलापूर), तेलबिया (जळगाव)
    (४ पैकी ३ : ७५ %)
    सबब प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. डी. के.कांबळे यांचे उपोषण बेकायदेशीर असून कृषि विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. अशी माहिती कुलगुरू यांच्या आदेशावरून विद्यापीठाचे कुलसचिव यांनी दिली आहे.

कुलसचिव
म. फु. कृ. वि.,राहुरी

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ