पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे, एनसीसी युनिट, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे  यशस्वी आयोजन

Posted by

राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रामध्ये साहस, धैर्य,  एकता आणि शिस्त हे गुण विकसित करण्यासाठी, एनसीसी युनिटकडून रतनगड ट्रेकिंगच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 25 छात्र व पाच अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

छात्रामध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. छात्र ही कृषी विद्यापीठांमध्ये असल्यामुळे त्यांना निसर्ग जैवविविधता, प्राणी आणि विविध वनस्पती जवळून बघण्याची आणि निरीक्षणाची संधी या मोहिमेदरम्यान लाभली. यामुळे त्यामध्ये निसर्ग प्रेम व पर्यावरण याविषयी जाणीव व जागृती निर्माण झाली.

रतनगड ट्रेकिंग मोहिमेसाठी त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कुलगुरू कर्नल डॉ. पी. जी. पाटील, कर्नल चेतन गुरबक्ष, कमांडिंग ऑफिसर, 17ध्य बटालियन एनसीसी, अहमदनगर तसेच डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे मार्गदर्शन लाभले.

या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे युनिट हे सप्टेंबर 1982 पासून 17 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, अहमदनगर यांच्या अंतर्गत कार्यरत आहे. मागच्या पाच वर्षापासून चार एनसीसी कॅडेट्स सर्विस सेलेक्शन बोर्ड  क्रॅक करून सेनेमध्ये अधिकारी पदावर रुजू झालेले आहेत. त्यामध्ये सब लेफ्टनंट वरच शिंदे, सब लेफ्टनंट महेश वाबळे, लेफ्टनंट सिद्धेश भालेराव आणि लेफ्टनंट बालाजी पवार ही आहेत आणि  एकूण 17 अधिकारी सैन्यामध्ये विविध पदावर कार्यरत आहेत.

तसेच या युनिट तर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या मागील चार कुलगुरू यांना मानद कर्नल पदवी प्रधान करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी चार इन्वेस्टीचर सिरमनी या विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत.

तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आतापर्यंत 13 CATC कॅम्प व चार थल सैनिक कॅम्प हे कॅम्पस मध्ये आयोजित केलेले आहेत.

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व सैन्यामध्ये अधिकारी पदावर जाण्यासाठी महाविद्यालयात सर्विस सेलेक्शन बोर्ड आणि व्यक्तिमत्व विकास यावर विविध कार्यशाळेचे आयोजन केलेले आहेत. तसेच मागील वर्षापासून ट्रेकिंगचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा रतनगड ट्रेकिंग चे आयोजन करण्यात आलेले होते

सहयोगी अधिष्ठाता, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रतनगड ट्रेकिंगचे आयोजन हे लेफ्ट. सुनील फुलसावंगे, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी, डॉ. प्रणव पावसे,  डॉ. हिमालया गणाचारी  यांनी केले.

तसेच महाविद्यालयाचे कार्यकारी परिषदेचे विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. एस एम नलावडे,  डॉ. कैलास कांबळे,  डॉ. एस. बी. गडगे, डॉ. व्ही. एन.  बाराइ, डॉ. कड, श्री व्ही. एम. बारटक्के  मार्गदर्शन लाभले.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ