,

डॉ. राजेंद्र वाघ उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्काराने सन्मानित

Posted by

डॉ. राजेंद्र वाघ उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्काराने सन्मानित
राहुरी विद्यापीठ, दि. 12 जून, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे पार पडलेल्या 52 व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ कापूस पैदासकार तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांना सन 2024 च्या उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कृषि क्षेत्रातील महत्वाचा असणारा हा पुरस्कार राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या कृषि शास्त्रज्ञास महाराष्ट्र कृषि संशोधन परिषद पुणे यांचेतर्फे दिला जातो. या पुरस्कार वितरण प्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, कृषि परिषदेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. विनायक काशीद व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते.
डॉ राजेंद्र वाघ यांनी कृषि संशोधन, शिक्षण तसेच विस्तार कार्यामध्ये भरीव अशी कामगिरी केली आहे. त्यांनी विविध पिकांचे आठ वाण विकसित केले असून यामध्ये टोमॅटो पिकाचे चार वाण, कांदा पिकाचे फुले समर्थ तसेच कापूस पिकाचे अती लांब धागा असणारे चार संकरित वाण यांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी 40 तंत्रज्ञान शिफारशींच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. राजेंद्र वाघ यांचे 50 पेक्षा जास्त संशोधनपर लेख आणि 70 पेक्षा जास्त मार्गदर्शकपर लेख प्रसिध्द झालेले आहेत. डॉ. राजेंद्र वाघ यांनी कृषि विषयक सात पुस्तकांचे लेखन केले असून ते शेतकरी वर्गाला मार्गदर्शक तसेच दिशादर्शक ठरणारे आहेत. कृषि शिक्षण विभागामध्ये डॉ. वाघ यांनी 45 आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. आत्तापर्यंत त्यांनी विद्यापीठातील विविध समितींचा पदभार सांभाळला असून अनेक जबाबदार्या योग्य प्रकारे पार पाडलेल्या आहेत. डॉ. राजेंद्र वाघ यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ