वसुंधरा रक्षण संकल्पाची

Posted by

आज जागतिक वसुंधरा दिन

li.आनंदी°पहाट.il 🌻

     वसुंधरा रक्षण संकल्पाची

  आज जागतिक वसुंधरा दिन

🏕️🌾🌴🦋🌞🦋🌴🌾🏕️

ॐ पृथ्वीदेव्यै विद्महे सहस्रमूर्तयै 
धीमहि तन्नो पृथ्वी: प्रचोदयात्   
    'वसुंधरा संरक्षण' या गोष्टीची सांगड ही तर आमच्या भारतीय संस्कृतीत धर्माशी म्हणजेच कर्तव्याशी जोडली गेलीय. आज मनुष्याची वृत्ती ही सुखे ओरबडण्याची झाल्याने, सुखासाठी होणाऱ्या  विकासासोबतच जगाचा प्रदूषणाने कोंडमारा होतोय. निसर्ग ऋतू चक्रच बदललेय.          
    सनातन भारतीय संस्कृतीने सर्वप्रथम पर्यावरणाचे महत्त्व ओळखले. ऋग्वेदात पृथ्वीचे महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथात डोंगर.. नद्या.. समुद्र यांना आदराचे स्थान आहे. चंद्र.. सूर्य यांना देव मानले. 'समुद्रवृसने देवी' श्लोक म्हणत आम्ही जमिनीवर पहिले पाऊल ठेवतो.
    इथे गोवर्धन पूजा होते. वाघ.. सिंह.. मूषक यांना देवता वाहन करतात. शंकराचार्य हे गंगा.. यमुना.. नर्मदा नदीचे अष्टक लिहून त्यांची स्तुती करतात. आमचे सर्वच संत निसर्ग महात्म्य सांगतात. जगदगुरु तुकोबा तर "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.." म्हणत अभेद्य नाते जोडतात.
    नर्मदा परिक्रमा असो वा.. गिरनार परिक्रमा, यांना पुण्यदायी मानली जाते. उद्देश नदी परिसरात निसर्ग सहवास. इथे पूर्वी पशुपक्षी मनुष्याशी बोलायचे. आजही काही ठिकाणी पक्षी बोलतात. आम्ही पंचमहाभुतांना मानतो. वास्तू पूजनावेळी बांधकामात होणाऱ्या कीटक.. जीवांची क्षमा मागतो. वड पूजन करतो. आंब्याच्या डहाळी असो वा प्रत्येक सणाला वेगवेगळ्या फुलाफळांना महत्त्व आहे. धार्मिक आधार जोडून विविधांगी फुले.. फळे.. सर्वच वृक्ष वेलींचे संवर्धन हा उद्देश.   
    पण जगाच्या हे फार उशीरा लक्षात आले. अमेरिकन गेलार्ड नेल्सन यांनी प्रदूषण.. वन्यजीव ऱ्हास यावर जागृती केली. १९७० पासून 'वसुंधरा दिन'.. 'अर्थ डे' चा जनजागृतीसाठी प्रारंभ झाला.
    अनेकविध सुखाच्या गरजा एवढ्या वाढल्या की त्याशिवाय जीवन जगणे अवघड झाले. पण पर्यावरणाचा ऱ्हास होवू लागला. मोठ्या लोकसंख्येला पोसणे.. सुख प्राप्त करुन देणे या खटाटोपीत आता वसुंधराच धापा टाकतेय. त्यामुळे आम्ही वसुंधरेला आणि स्वतःलाही मोठ्या संकटात लोटलेय.
    पण आता जगाला जाग आलीय. भारताची वसुंधरा संरक्षण भूमिका जगात मान्य झालीय. भारतातही उर्जा प्राप्तीसाठी सोलर एनर्जी प्रकल्प गावोगाव.. घरोघरी सुरू होत आहेत. समुद्रात  जाणारे पाणी  वाचावे.. दुष्काळ.. पूर समस्या टाळण्यासाठी नदी जोड प्रकल्प असे प्रयत्न होत आहेत. गावोगाव नदी स्वच्छता मोहीम होत आहे. नैसर्गिक शेती करण्यावर भर देत आहेत. प्लॅस्टीकचा किमान.. सुयोग्य वापर करणे. नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करणारे ''आदर्श गाव', 'स्वच्छ भारत' संकल्पना मनामनात रुजवली जात आहे.       
    वृक्षारोपण.. संवर्धन हा जनतेची चळवळ झालीय. वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी जंगले निर्माण होत आहेत. प्रदूषण मुक्त ई वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवाजावर मर्यादा घातली गेलीय पण त्याचे कठोर पालन झाले पाहिजे. असे अनेक प्रयत्न आपल्या कडून झाले पाहिजेत.
    हे प्रदूषण संकट एकट्यावरचे नाही. जगावरचे आहे. निराकरणास संपूर्ण जगाची साथ हवी. आम्ही शांततामय जगासाठी प्रयत्न करतो. जगातील युद्ध टाळण्यासाठी भूमिका बजावतो. आमच्या पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या भूमातेच्या.. वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करू या.

🦋🌴🍑🌾🌎🌾🍑🌴🦋

हा नाश थांबवा
भूमातेचे तन मन जळते आहे
ही वसुंधरा जनसंखेच्या
भाराने रडते आहे ॥धृ॥

पृथ्वीच्या पाठीवरती ही
अफाट झाली गर्दी
गर्दीतच जन गुदमरती,
दु:खात किती तळमळती
हे संततीचे अज्ञान जगाला
भेसूर छळते आहे ॥१॥

ही डोंगरकडची राने,
ही फळे फुले अन् पाने
हे नद्या झऱ्यांचे गाणे,
निर्मिले सुहास्य वदनाने
पण रवी चंद्राचे तेज का रे
मावळते आहे ॥२॥

या नद्या नव्हे रे गंगा
संजीवन तुजला देती
तू करुनी जल अपवित्र
का पाप घेतसे माथी
हे पात्र नद्यांचे सुखमय कर
दुसरीकडे वळते आहे ॥३॥

हा पावन निर्मल वारा,
जो श्वास तुझा रे होतो
तू दूषित करुनी त्याला,
विश्वास कसा गमवितो
हे दु :ख अनावर धरणीला रे
अविरत सलते आहे ॥४॥

ही झाडे तुजला देती रे
उन्हात शीतल छाया
अन मधुर फळे पुरविती रे
जीव तुझा जगवाया
हि कुरहाड झाडांवरती नाही
तुजवर पडते आहे ॥५॥

ही पुन्हा हसावी धरणी,
पक्ष्यांनी गावी गाणी
धावे कर्तव्य म्हणुनी,
ही बिरादरी इन्सानी
या अभियानात सामील व्हा,
ज्यांना हे कळते आहे ॥६॥

🏕️🌾🌳🌻🌎🌻🌳🌾🏕️

गीत : विलास जैतापकर ✍️
संगीत : अशोक वायंगणकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹
            २२.०४.२०२४