भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ, दि. 16 एप्रिल, 2024

Posted by

भारतीय विस्तार शिक्षण सासायटीच्या उपाध्यक्षपदासाठी देशात नुकतीच ऑनलाईन निवडणूक पार पडली. ही निवडणूक देशामध्ये चार विभागात घेण्यात आली. डॉ. मिलिंद अहिरे यांनी पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता.

पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधुन निवडणूक ऑनलाईन पध्दतीने पार पडली. यामध्ये डॉ. मिलिंद अहिरे यांना सर्वात जास्त 90 टक्के मते पडून ते विजयी झाले. त्यांच्या या उपाध्यक्षपदाच्या निवडीमुळे विद्यापीठाच्या विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.
डॉ. मिलिंद अहिरे सध्या कृषि विस्तार व संज्ञापन विभागात प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहे. या आधी त्यांनी कृषि महाविद्यालय, धुळे आणि हाळगावचा सहयोगी अधिष्ठाता पदाचा पदभार सक्षमपणे सांभळला आहे. कृषि विस्तार व संज्ञापन विभागाचे विभाग प्रमुख म्हणुन पाच वर्ष कार्यक्षमपणे पदभार सांभाळला आहे. याआधी त्यांनी भाकृअप समन्वय अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आणि विद्यापीठाच्या नियोजन, मुल्यमापन आणि देखरेख प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन सक्षमपणे काम पाहिले आहे.

डॉ. मिलिंद अहिरे यांनी 2005 साली जी.बी. पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातुन कृषि विस्तार या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. कृषि विद्यापीठात त्यांना विविध पदांचा 29 वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एजुकेशनच्या सहसचिवपदी त्यांची नेमणुक असुन सोसायटी ऑफ कृषि विज्ञानच्या पश्चिम विभागाचे समन्वयक म्हणुन ते काम बघत आहे.

आग्रा येथील विस्तार शिक्षण सोसायटीचे इंडियन रीसर्च जर्नल ऑफ एक्सटेंशन एजुकेशनच्या संपादकीय मंडळाचे सदस्य म्हणुन कार्यरत आहेत. धुळे येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणुन त्यांनी चार वर्ष शेतकरीभिमुख विस्तार कार्य केले आहे. त्यांनी आतांपर्यंत 22 एम.एस्सी. (अॅग्री) आणि 12 पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

कृषि विद्यापीठाचे प्रसारण केंद्र प्रमुख असताना त्यांनी विविध विद्यापीठ प्रकाशनांचे संपादन केले आहे. यामध्ये कृषिदर्शनी, श्रीसुगी, कृषिवार्ता असे अनेक प्रकाशनांचे संपादन त्यांनी केले आहे. राज्यस्तरीय विविध समित्यांवर त्यांची तज्ञ सल्लागार आणि सदस्य म्हणुन नेमणूक आहे.

त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यामध्ये मानाचे समजले जाणारे डॉ. जी.एस. विद्यार्थी मेमोरीयल पुरस्कार आणि युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे आतांपर्यंत 100 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले असुन विविध पुस्तकांचे त्यांनी संपादन केलेले आहे.

डॉ. मिलिंद अहिरे यांचे शेतकर्यांसाठी 60 हून अधिक कृषि विषयक लेख वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *