कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाला वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर
राहुरी विद्यापीठ, दि. 25 जून, 2024
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतीक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्यातून हवामान अद्ययावत व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र (कास्ट) हा प्रकल्प सन 2018-2023 या कालावधीत राबविण्यात आला. या प्रकल्पाला या वर्षासाठीचा उल्लेखनीय कृषि योगदान पुरस्कार मुंबई येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतीष्ठानच्या वतीने जाहीर झाला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजे दि. 1 जुलै, 2024 रोजी मुंबई येथे होणार्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला होता. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुनील गोरंटीवार, सह प्रमुख अन्वेषक डॉ. मुकुंद शिंदे व त्यांच्या टीमने नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये खेचून आणला. मागील पाच वर्षामध्ये या प्रकल्पातर्फे विद्यार्थी, प्राध्यापक व शेतकरी या सर्वांसाठी अत्यंत मोलाचे संशोधन व भविष्यातील शेतीच्या दृष्टीने महत्वाचे असे बळकटीकरणाचे कार्य झाले आहे. या प्रकल्पातर्फे जे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. त्याचा लाभ गेल्या तीन वर्षात सुमारे 70,000 प्रशिक्षणार्थींना झाला आहे. कास्ट प्रकल्पातर्फे झालेले शेतीचे बळकटीकरण निश्चितच महाराष्ट्रासाठी व देशासाठी भुषणावह असे आहे
Follow Us
Recent Posts
- पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे, एनसीसी युनिट, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे यशस्वी आयोजन
- विद्यार्थ्यांनी आयुष्यात सहकार्याची भावना जोपासावी
- राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफणचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ
- महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफण-2024 कार्यक्रम संपन्न
- डिजिटल तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर ठरणार
Categories
- Agriculture 21
- Education 32
- News 13
- Technology 11
- Uncategorized 2
Tags
कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ