कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना कर्नलपदाने सन्मानीत केले जाणारराहुरी विद्यापीठ, दि. 25 एप्रिल, 2023

Posted by

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानद कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे.

मंगळवार दि. 2 मे, 2023 रोजी विद्यापीठात होणार्या दिमाखदार सोहळ्यात अतिरिक्त महासंचालक, मेजर जनलर वाय.पी. खांदुरी यांच्या हस्ते कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना बॅटन, सन्मानपत्र व कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे.

याप्रसंगी औरंगाबाद येथील ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर यु.के. ओझा, अहमदनगर कॅन्टॉमेन्ट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रांत मोरे, अहमदनगर 17 महाराष्ट्रीयन बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन गुरबॅक्स, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, नियंत्रक श्री. विजय पाटील, ले. सुनिल फुलसावंगे उपस्थित असणार आहेत.

या कृषि विद्यापीठातील हे पाचवे कुलगुरु आहे ज्यांना कर्नलपदाने सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *